Sat, Oct 24, 2020 08:26होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: खामगाव येथे दोन तरुणींचा बुडून मृत्यू

औरंगाबाद: खामगाव येथे दोन तरुणींचा बुडून मृत्यू

Last Updated: Oct 23 2020 1:18AM
कन्नड (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

कन्नड तालुक्यातील खामगांव येथील खारी खामगांव नदीमध्ये सख्या दोन चुलत बहिणीचा पाण्यात बुडल्याने मृत्यु झाला आहे. या घटनेतील मृत्यूची नावे आरती कैलास कवडे (वय २२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (वय १८) अशी आहेत.  

एकादशी असल्याने आज मंगळवारी (दि.१३) रोजी दोघी बहिणी आरती आणि ऋतुजा खारी खामगाव नदी पलीकडील महादेव मंदिरकडे नदीतून दर्शनसाठी जात होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघीही बुडाल्या. मागील वर्षीच नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरण झाले असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने खामगाव गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक वाचा 

तुळजाभवानी मंदिर खुले करण्यासाठी तुळजापुरात उपोषण

भारताचे माजी फुटबॉल कर्णधार कार्लटन चॅपमन कालवश 

 "