Thu, Sep 24, 2020 10:20होमपेज › Aurangabad › पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले

पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले

Published On: Jul 21 2019 12:49PM | Last Updated: Jul 21 2019 12:57PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कन्नड, सिल्लोड तालुक्यात तर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे नद्या, नाले तुंडूब भरून वाहत आहेत. भारंबा तांडा येथे या पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका वनरक्षकाचा मृतदेह हाती लागला आहे. राहुल दामोदर जाधव (वय-३०,रा. सिंदखेडराजा) असे या वनरक्षकाचे नाव आहे. 

तालुक्यातील पिशोर परिसरात काल, शनिवारी (दि.२०) रोजी मुसळधार पावसाने अंजना नदी सह सर्वच नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पुराच्या पाण्यात वनविभागाचे दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली होती. आज, रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघड़कीस आली आहे. यातील राहुल दामोदर जाधव यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर अजय संतोष भोई (रा. शिरपुर जि. नंदुरबार) हे अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी वन अधिकारी, पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी शोध घेत आहेत.