Thu, Jul 02, 2020 12:11होमपेज › Aurangabad › धोंड्याची वारी, दोन लाख महिला भाविक नाथनगरीत दाखल!

धोंड्याची वारी, दोन लाख महिला भाविक नाथनगरीत दाखल!

Published On: May 25 2018 5:48PM | Last Updated: May 25 2018 5:45PMपैठण :  मनोज परदेशी 

पुरूषोत्तम मासातील धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असलेल्या कमला एकादशी  (धोंड्याची वारी ) निमित्ताने गुरूवारी राञीपासूनच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातून जवळपास  एक लाख महिला भाविक पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. गावातील, बाहेरील नाथ मंदिर व परिसर तसेच गोदाकाठ भाविक महिलांनी  गजबजून गेला आहे. या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे हजारो महिला भाविक मुक्कामी थांबल्या होत्या. भजन, गवळणी व सोंगी भारूडांचा महिला भाविकांनी लाभ घेतला. आज शुक्रवारी कमला  एकदशी-धोंड्याची वारीसाठी किमान दोन लाख महिला भाविक नाथ नगरीत दाखल झाले आहेत.  मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंदन इमले , उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी दोन्ही नाथ मंदिर, परिसर ,बसस्थानक व गोदाकाठावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पैठण नगरीमध्ये तीन वर्षांनी एकदा येणार्‍या पुरूषोत्तम मास ( अधिक मास ) कमळा एकादशीचा  पर्वकाळ निमित्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून  शुक्रवार लाखोच्या संख्येने महिला गोदावरी मातेस विविध प्रकाराचे धोंड्याचे वा देण्यास तथा धार्मिक कृत्ये करण्यासाठी नाथांचा नगरीत सकाळी सहा वाजेपासुन येत आहे. विशेष करून गोदावरी मातेस वान देण्यासाठी साखर बत्ताशेला मोठी मागणी असते. यासाठी याञा मैदान परिसरामध्ये चार साखर बत्ताशे बनविणार्‍या कारखान्याचा माध्यमातुन आज दुपारपर्यंत ३० क्विंटल साखर बत्ताश्यांची विक्री झाल्याची माहिती रामसिंग परदेशी, संतोष  बनसोडे, अनिताबाई परदेशी आणि प्रदीप राजपूत यांनी दिली आहे.

दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिकमासाचे पैठण नगरीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. या महिन्यांमध्ये गोदावरी नदीत पवित्र स्नान करून दान, जप, तप, ग्रंथवाचन, नामस्मरण केल्याने पुण्यफल मिळून त्या व्यक्तीस मोक्ष प्राप्त होते. अशी माहिती वेदमुर्ती चंद्रशेखर चक्रे यांनी दिली. तसेच या अधिक मासाचा महिन्यामध्ये गोदावरी मातेस धोंड्याचे वान देण्यासाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र.विदर्भातून लाखो महिला पहाटे सहा वाजेपासुन गोदावरी नदीवरील श्रीकृष्ण कमळा तीर्थावरील मोक्ष घाट परिसरात स्नान करुन वेदमुर्ती पोरोहीतांच्या मंत्र घोषात गोदावरी पात्रामध्ये तांब्याचे दिवे लावून नदी पाञामध्ये सोडण्यात येत असून  त्याबरोबरो साखर बत्ताश्यांचे वान देण्याची धार्मिक प्रथा असल्याने साखर बत्ताश्यांना अधिक मासामध्ये फार महत्व असल्याने भाविक महिलांमध्ये याची मोठी मागणी असते. सदर बत्ताशे ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे, या व्यवससायामुळे असंख्य बेरोजगार युवकांना पाचशे ते सहाशे रूपयांपर्यंत रोजगारही मिळतो.