Tue, Sep 22, 2020 00:59होमपेज › Aurangabad › ट्रॅव्हल बसच्या धडकेने वाळूजला दुचाकीस्वार ठार

ट्रॅव्हल बसच्या धडकेने वाळूजला दुचाकीस्वार ठार

Last Updated: Jan 18 2020 1:29AM
वाळूज : प्रतिनिधी

गंगापूरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्स बस आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना (दि.12) रविवारी मध्यरात्री वाळूजच्या लांझीरोडनजीक घडली आहे.

बाबासाहेब भाऊसाहेब बनसोडे (33 रा.वाळूज), असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगिलते की, लांझी रोडवरून बाबासाहेब बनसोडे हे आपल्या दुचाकीवर बसून (क्रमांक एम.एच. 20 एफ बी.-6275) मुख्यरोडने गावात जात होते. त्याचवेळी गंगापूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच. 21 एक्स 8297) त्यांच्या दुचाकीला धडकली. या अपघातात घटनेत खासगी बाबासाहेब बनसोडे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी सदरची बस ताब्यात घेतली आहे. 

मृत बनसोडे हे विवाहित असून त्याला तीन मुली,एक मुलगा व पत्नी आहे.या घटनेने गावात हळहळ व्यक्‍त होत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण अपघातस्थळ म्हणून ओळखल्या जाते. यापूर्वीही येथे अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने याठिकाणी नव्याने उपाययोजना राबविण्याची मागणी वाळूजकरांतून होत आहे.
 

 "