Sat, Oct 31, 2020 14:02होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : महिलेची हत्या करुन मृतदेह टाकला विहिरीत  

औरंगाबाद : महिलेची हत्या करुन मृतदेह टाकला विहिरीत  

Last Updated: Oct 27 2020 1:34AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

शिऊर (जि. औरंगाबाद) येथील बाजारतळ जवळील शेतात ५५ वर्षीय महिलेची हत्या करत तिचा मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकून दिल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी ही  हत्या केली असून हत्या मागील कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी सुभाष अंकुश पवार (वय ३५) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एक आरोपी फरार झाला आहे. चंद्रकला परसराम मोरे असे मयत महिलेचे नाव आहे.

शिऊर गावाजवळील एका विहिरीत महिलेचे प्रेत तरंगत असल्याची माहिती शिऊर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी गावालगत असलेल्या गट नंबर ९ मधील शेतातील विहिरीमध्ये ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.  या महिलेचा खून करुन तिला एका साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विहिरीत पाण्यावर तरंगत असलेले प्रेत दोरीच्या सहाय्याने पोलिसांनी विहिरीबाहेर काढले. हा मृतदेह शिऊर येथील रहिवासी महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. या मृतदेहाची उत्तरीय तपासणी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाच तासातच एकास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला आरोपी सुभाष पवार त्याने खुनाची कबुली दिली आहे. दि १२ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हत्या केल्याचे सांगितले आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार आहे. 

मृत महिला चंद्रकला परसराम मोरे हीचे जिल्हा परिषद शाळेजवळ घर आहे. घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर त्यांचे प्रेत सापडले. चंद्रकला यांना ठार मारल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह कापूस वेचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साडीच्या गोणीत टाकून विहिरीत टाकला. मयत चंद्रकला ह्या मोलमजुरी करून उपजीविका भागवत असे.

 पोलिस उपअधीक्षक गणेश गावंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिऊर पोलिस ठाण्यात सुरू आहे. आरोपींनी हा खून का केला याची उकल लवकरच होईल असा विश्वास सपोनि सत्यजित ताईतवाले यांनी व्यक्त केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

औरंगाबाद: खामगाव येथे दोन तरुणींचा बुडून मृत्यू

औरंगाबाद : आमदार प्रदीप जैस्वाल यांना बंधूशोक 

रेल्वेच्या 'की मॅन'ला हल्ला करून लुटलं

 "