होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : टँकर आणि क्रुझरची धडक,१४ जखमी

औरंगाबाद : टँकर आणि क्रुझरची धडक,१४ जखमी

Published On: May 29 2019 4:11PM | Last Updated: May 29 2019 4:13PM
सिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड -  कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ एका पाण्याच्या टँकरने लग्न समारंभासाठी जाणाऱ्या क्रुजरला समोरा समोर जोराची धडक दिली. या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना (दि.२९) बुधवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात जखमी झालेल्यामध्ये सहा मूली,सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे.

अपघातात जखमी झालेल्‍यांची नावे साईंदास रायसिंग राठोड वय २६ वर्ष, स्वाती विट्ठल पवार (वय १२ ), गेनूबाई हरजी राठोड (वय ६५), हीरालाल शामराव राठोड (वय ३०), नंदनी दासु (वय १०), नंदनी विट्ठल राठोड (वय १२), एकनाथ काशीनाथ राठोड (वय २२), पायल विठुबाई पवार (वय १२), रोहिदास धनु राठोड (वय ८०), दासुसेवा राठोड (६०), बाबिताबाई एकनाथ राठोड (वय ८), काजल सुंदरसिंग राठोड (वय १४), संजय रामचंद्र राठोड (वय ३५), पार्वतीबाई आनंदा राठोड (वय ४५) अशी आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथून क्रूजर वाहनात सतरा जन  कन्नड तालुक्यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नाला जात होते. यावेळी सिल्लोड़ कन्नड रोड वरील दिगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने लग्नासाठी जात असलेल्या क्रुजरला जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने ही रसत्यावरील पुलाखाली फरफटून घसरत गेली. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर डॉ उमेश विसपुते, डॉ शेख हुजैफ, डॉ शेख अल्तमश यांनी प्राथमिक उपचार करुण अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले आहे.

अपघातात क्रुजरचा चकनाचूर झाला......

हा अपघात इतका भयंकर होता की, अपघात होताच दोन्ही वाहने ही रसत्यावरील पुलाच्या खाली घसरत फ़रफटत गेली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोराची व भयानक होती की, या अपघातात क्रूजरचा चकनाचूर झाला. सुदेवाने या भयंकर अपघातात कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

यांनी केली मदत.......

या घटनेची माहिती मिळताच दिगावचे माजी सरपंच विठ्ठल सुसुंदरे, उप सरपंच राजु तुपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या जखमींना बाहेर काढुन सिल्लोड येथे रवाना केले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परीसरातील नागरिकानी मोठी गर्दी केली होती.