Wed, Dec 11, 2019 16:04होमपेज › Aurangabad › काचीगुडा मनमाड पॅसेंजरवर दगडफेक

काचीगुडा मनमाड पॅसेंजरवर दगडफेक

Published On: May 08 2019 8:26PM | Last Updated: May 08 2019 8:26PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

काचीगुडा मनमाड पॅसेंजर औरंगाबादहून संध्याकाळी १९:१७ वाजता सुटली. बनेवाडीच्या आधी राजीव गांधी नगर पैठण रेल्वे उड्डाणपूलाच्या जवळ काही अज्ञातांनी पॅसेंजरवर दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला. 

खिडकीला बॅग लटकून असल्याने कोणाला सुदैवाने कोणालाही मार लागला नाही. मात्र रेल्वेवर दगडफेकीचे प्रकार सुरूच असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही दगडफेकीच्या घटना घडला आहे.