Sat, Jul 11, 2020 20:52



होमपेज › Aurangabad › ‘भाजप सोडली म्हणून दानवेंनी शिवसैनिकांना गोवले’

‘भाजप सोडली म्हणून दानवेंनी शिवसैनिकांना गोवले’

Published On: Dec 14 2017 12:28PM | Last Updated: Dec 14 2017 12:28PM

बुकमार्क करा





औरंगाबाद : प्रतिनिधी

भाजपतून सेनेत प्रवेश करून रस्ता कामाला विरोध करत न्यायालयात लोकहित याचिका दाखल केल्याने सिल्लोडचे शिवसैनिक व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाभाजप प्रदेशाध्यक्ष  खा. रावसाहेब दानवे यांनी खोट्या गुन्ह्यात गोवले असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे केला आहे. त्यावर आयुक्त यशस्वी यादव यांनी या प्रकरणाची तीन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश उपायुक्त राहुल श्रीरामे यांना दिला आहे. 

सिल्लोड येथील शिवसैनिक रघुनाथ शांताराम घरमोडे हे 11 डिसेंबर रोजी फुलंब्री येथे निवडणूक प्रचारासाठी आपल्या सहकार्यांसह आले होते. दुपारी ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीने जालना रोडवरून जात होते. या वेळी हायकोर्टाकडे जात असताना त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून तो रिक्षाचालक शेख अब्दुल शेख हमीद वय 47, रा.बायजीपुरा यांना लागला. त्यावरून शेख व घरमोडे यांच्यात वाद झाला. तसेच रमोडे  त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी मारहाण करून आपल्या खिशातील बाराशे रुपये काढून घेऊन जिवे मारण्याची तक्रार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिली. ही तक्रार खोटीअसून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घरमोडे  यांना मध्यरात्री प्रचंड पोलिस बंदोबस्तासह घरातून अटक करत अपमानित करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाचा  पास पोलिस उपनिरीक्षक सिद्दीकी हे करत आहेत. दरम्यान, भोकरदन-देऊळगाव राजा या शहरांना हमरस्त्याद्वारे जोडण्यासाठी 66.73 किलोमीटर रस्त्यासाठी चारशे सहा कोटी  रुपयांचा निधी आहे. मात्र घरमोडे यांनी अॅड.रूपेश जैस्वाल यांच्यामार्फत हायकोर्टात प्रस्तावित रस्त्याचे काम थांबविण्यासाठी लोकहितवादी याचिका दाखल केली. त्यामध्ये  भोकरदन ते देऊळगाव राजा रस्ता हा 53 किलोमीटरचा आहे. हा मार्ग भोकरदन, हसनाबाद, जवखेडा, राजूर, देऊळगाव राजा असा प्रस्तावित आहे. मात्र जवखेडा हे गाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे  असल्याने इतर सोईस्कर मार्ग वगळून राजकीय लाभासाठी या रस्त्याचा अट्टहास केला जात आहे.

ही याचिका दाखल केल्याने व घरमोडे यांनी  भाजपचा त्याग करून सेनेत प्रवेश केला असल्यामुळे केवळ आकसापोटी, राजकीय दबाव आणून त्यांच्या विरुद्ध हे षड्यंत्र रचून बनावट प्रकरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे  पोलिसांनी अशा राजकीय दबावाखाली शहानिशा न करता जनतेस वेठीस धरणे योग्य नसल्याने याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  उपायुक्त राहुल श्रीरामे करणार चौकशी घरमोडे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामध्ये पोलिसांची पूर्ण चूक आहे असे वाटत नाही.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असून या प्रकरणी  इम्रान नावाच्या एका  व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्याशिवाय खरा प्रकार समोर आणण्यासाठी उपायुक्त राहुल श्रीरामे यांना चौकशी करण्यास सांगितले हे. ते येत्या तीन दिवसांत  हवाल देणार असल्याचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.