Sat, Feb 22, 2020 09:49होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत रिद्धी, सिद्धी भगिनी चमकल्या

औरंगाबाद : राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत रिद्धी, सिद्धी भगिनी चमकल्या

Last Updated: Jan 21 2020 8:12AM
संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रतिनिधी

डोंबिवली  येथील श्रावण स्पोर्टस अकॅडेमी येथे १९ व २० जानेवारी रोजी झालेल्या ५४ व्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत संभाजीनगर येथील साईच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटात स्थान मिळवले. या स्पर्धेत सिध्दीने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य तर रिध्दीने दोन रौप्य पदकाची कमाई केली आहे.

वाचा : सिद्धिविनायकाच्या चरणी ३५ किलो सोने

सिद्धी हत्तेकरने बॅलन्सिंग बीम (१०.९५ गुण) व फ्लोअर एक्सरसाईज (१०.७० गुण) या प्रकारात सुवर्ण, अनईवन वार (८.२५ गुण) या प्रकारात कांस्यपदक तसेच वैयक्तिक सर्वसाधन अजिंक्यपद स्पर्धेत (४०.८५ गुण) उपविजेतेपद पटकावत आपले वर्चस्व वरिष्ठ गटातही सिद्ध केले. तिच्या जुळ्या बहिणीने रिद्दी हिने बॅलन्सिंग बीम (१०.९५) व फ्लोअर एक्सरसाईज (१०.६५) या प्रकारात रौप्यपदक पटकावले. वैयक्तिक सर्वसाधारण (३९.८५) अजिंक्यपद स्पर्धेत पाचवे स्थान प्राप्त करत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले. तसेच साईच्या अजय पगारे याने कनिष्ठ गटात पॅरलल बार्स या प्रकारात ११.६५ गुण घेत कांस्यपदक पटकावले.

वाचा : Australia Open : फेडरर, सेरेनाची आगेकूच

रिद्दी व सिद्धी हत्तेकर यांनी प्राथमिक प्रशिक्षण मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तनुजा गाढवे यांच्याकडे घेतले. सध्या त्या भारतीय खेल प्राधिकरणाच्या संभाजीनगर केंद्रात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे व पिंकी देव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल भारतीय खेल प्राधिकरणाच्या उपसंचालिका सुषमा ज्युत्सी, उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा उपसंचालक उâर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, तनुजा गाढवे, संजय गाढवे, राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे सचिव डॉ. मकरंद जोशी, संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष संकर्षण जोशी, अध्यक्ष आदित्य जोशी, सचिव हर्षल मोगरे, सर्व पदाधिकारी खेळाडू पालक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.