Mon, Aug 10, 2020 05:39होमपेज › Aurangabad › नोंदणी : लोकसभा निवडणुकीपर्यंत मिळणार तीन संधी

नोंदणी : लोकसभा निवडणुकीपर्यंत मिळणार तीन संधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील मतदार संख्येत दीड लाखांची भर पडली आहे. मतदारांची संख्या आता 26 लाख 36 हजारांवर पोहोचली आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीपर्यंत नावनोंदणीच्या आणखी तीन संधी मतदारांना मिळणार आहेत.

2014 या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 370 मतदार होते. 1 जानेवारी 2017 रोजी ही संख्या 25 लाख 95 हजार 66 पर्यंत गेली. ऑक्टोबरअखेर 41,288 मतदारांची त्यात भर पडली असून, सध्या जिल्ह्यातील मतदारांची संख्या 26 लाख 36 हजार 354 एवढी झाली आहे. 14 लाख 157 पुरुष, 12 लाख 36 हजार 178 महिलांचा यात समावेश असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. 2018 या वर्षात जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यांत मतदार यादीत नावनोंदणी करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

19 तृतीयपंथी मतदार

जिल्ह्यात 19 तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे. औरंगाबाद (पश्‍चिम) मतदारसंघात 12, गंगापूर मतदारसंघात 6, तर कन्नड मतदारसंघात एक तृतीयपंथी मतदार आहे.