सिल्लोड : प्रतिनिधी
येथील एसटी बस स्थानकातून शिंदेफळ येथे सासरी जाण्यासाठी विवाहित मुलीला तिच्या वडिलांनी बसमध्ये बसवले होते. मात्र त्यांची मुलगी देवकला श्यामलाल सिंगल ही सासरी पोहचलीच नाही. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली मात्र पोलिसांकडून कोणतीही हालचाल केली गेली नाही.
यामुळे राजपूत समाज बांधवांनी पोलिस प्रशासनाला बेपत्ता विवाहित मुलीचा शोध घेण्यासाठी निवेदन दिले आले आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जर काही बरे वाईट झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.