Wed, Feb 19, 2020 13:20होमपेज › Aurangabad › शरद पवारांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काय म्हणाले?

शरद पवारांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Last Updated: Feb 16 2020 1:45AM

राज ठाकरेऔरंगाबाद :  पुढारी वृत्तसेवा  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील मोर्चा दरम्यान राज ठाकरे यांनी जे भाषण केले त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर मी भाषण त्यांच्यासाठी केलेचं नव्हते, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिले आहे.

वाचा : लोक काहींना ऐकायला येतात...शरद पवारांचा राज ठाकरेंवर ‘निशाणा’

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. चिकलठाणा विमानतळावर गुरुवारी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपले जातात. शरद पवार यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. माझा हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी आहे. या शहराचे प्रश्न आणि निवडणुकीची जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांकडे सोपवणार आहे. 

वाचा : शरद पवार चाणक्य आहेत का?; अमित शहा म्हणाले...

मनसे कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करते तर कधी त्यांची पाठराखण करते. वारंवार भूमिका का बदलली जाते या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, त्यांनी जे चांगले केले त्याला मी पाठिंबा देणार आणि जिथे चुकले तिथे टीका करणार. यालाच हेल्दी राजकारण म्हणतात. हिंदुत्ववाद ही काही माझी नवी भूमिका नाही. मशिदीवरील भोंगे बंद केले जावेत यासाठी पुर्वीही मी आंदोलने केली आहेत. हिंदुत्व आहेच, पण त्यासोबत माझ्या भूमिकेला विकासाचे टोक आहे. मी केवळ पक्षाचा झेंडा बदलला आहे. पक्षाची भूमिका होती तीच कायम आहे. झेंड्यावरील राजमुद्रा ही माझी प्रेरणा आहे. निवडणुकीत ही राजमुद्रा झेंड्यावर तुम्हाला दिसणार नाही. 

वाचा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; नवलखा, तेलतुंबडेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीस वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे त्यांनी काय दिवे लावले हे तुम्ही जाणताच. इथला कचरा प्रश्न, पाणीप्रश्नसुद्धा त्यांना सोडवता आलेला नाही. आम्ही नाशिकमध्ये जे काम करून दाखवले, तसेच सगळीकडे करायचे आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाविषयी विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, या शहराचे नामांतर करण्यास काय हरकत आहे? चांगले बदल झालेच पाहिजेत.