Tue, Jul 14, 2020 00:45होमपेज › Aurangabad › रविदास महाराजांचे ६०० वर्षापूर्वीचं मंदिर पाडल्याचा निषेधात पैठणला निदर्शने

रविदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पैठणमध्ये निदर्शने

Published On: Aug 24 2019 5:57PM | Last Updated: Aug 24 2019 5:57PM
पैठण : प्रतिनिधी 

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांचे ६०० वर्षापूर्वीचे मंदिर दिल्ली सरकारने अकारण पाडले. तेथील समाजाच्या नावावर असलेली जागा ताब्यात घेण्याचा घाट केजरीवाल सरकारचा असल्याचा आरोप करत चर्मकार समाजाच्या वतीने निर्दशने करण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर चर्मकार समाजाचे नेते खुशालराव भवरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज बांधवांच्या वतीने या विरोधात तीव्र निर्दशने करण्यात आली.

पैठण तालुका कार्यकारिणीच्या वतीने या बेजबाबदार कृत्याला पाठबळ देणार्‍या केजरीवाल सरकारचा निषेध व्यक्त करत सदरील जागेवर पुन्हा मंदिर बांधून परिसरातील 6 एकर जागा रविदास ट्रस्टला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी चर्मकार नेते खुशालराव भवरे,एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बर्डे,वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू उगले, स्वप्नील साळवे, माजी नगरसेवक दिलीप मगर, सीताराम गारदे, सतीश भवरे, अशोक शेळके, राजकुमार पवार, आदींसह मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे नागरिक उपस्थित होते.