Sat, Oct 31, 2020 13:05होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : वडगाव कोल्हाटीत एकाचा चाकूने भोकसून खून

औरंगाबाद : वडगाव कोल्हाटीत एकाचा चाकूने भोकसून खून

Last Updated: Oct 27 2020 1:34AM

संग्रहीत फाेटाेगंगापूर : पुढारी वृत्तसेवा

वडगाव कोल्हाटी येथील एका व्यक्तीचा अज्ञातांनी गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव ते शंकरपूर रस्त्यावर आणून चाकूने भोकसून खून केला. ही घटना बुधवारी (दि. १४) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खून केलेल्या व्यक्तीचे नाव सुनील दादाराव शेजूळ (वय ४०) असे आहे. या प्रकारणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी येथील सुनील शेजुळ यास १४ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातानी गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव रस्त्यावर आणले. यानंतर त्याच्यावर चाकूने पोटात, गळ्यावर तसेच हातावर वार करून खून केला.  

या घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली असता उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पीएसआय राम बाराहाते, सतीश दिंडे, पिएसआय सांळुके, विठ्ठल राख, रामेश्वर धापसे, आय बाईक पथकचे पो ना. एल. एच. सपकाळ. पो.कॉ. विकास नजन, संतोष धाडबले, गिरी आदींनी पाहणी केली. घटनास्थळावर पोलिसांना मिरची पुड, दारुच्या बाटल्या, तसेच दोन चाकू आढळून आले असून  ते पोलिसांनी जप्त केले आहेत. घटनेच्या तपासादरम्यान श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते मात्र, श्वानास काहीच हाती लागले नाही.

श्वान पथकाचे हेड कॉन्स्टेबल व्यवहारे, तळेकर, वाहन चालक शिंदे, श्वानाचे नाव स्विटी आदींनी धाव घेत पाहणी केली. खून कोणी आणि कोणत्या कारणाने झाला यांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर आदी करत आहेत.
अधिक वाचा 

तुळजापूर तालुक्यात आठ दिवसांपासून वीज पुरवठा बंद, कसे चालणार ऑनलाईन शिक्षण 

पुण्यातील धडकी भरवणाऱ्या 'त्या' रात्रीच्या पुन्हा आठवणी जाग्या

 "