Sat, Dec 07, 2019 08:57होमपेज › Aurangabad › नागपूर -मुंबई महामार्गावर शॉर्टसर्किटने ट्रकला आग

नागपूर-मुंबई महामार्गावर शॉर्टसर्किटने ट्रकला आग

Published On: May 25 2019 2:34PM | Last Updated: May 25 2019 2:15PM
लासुरगाव : प्रतिनिधी  

वैजापुर तालुक्यातील करंजगाव येथे जालना येथून मुंबईकडे लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे दि. २५ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. 

करंजगाव तालुक्यातील वैजापूर परिसरात नागपूर -मुंबई महामार्गावरून ट्रक चालक प्रदिप चव्हाण (ट्रक क्र. MH ०४ EL २८९४) हे लोखंडी गज घेऊन मुंबईकडे जाताना करंजगावच्या पश्चिमेस असलेले परसोडा फाटाजवळ चालू ट्रकच्या मशीनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यानंतर शॉर्टसर्किट होवून अचानक ट्रक आग लागली. 

यानंतर चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभे करून त्यातून ते बाहेर पडले. त्यानंतर या परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने पालखेडकडे जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला उभे करून आग विझवली. या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. यामध्ये पाणी टँकर चालक सोन्याबापु मराठे, रवी मोकळे, सतीश मगर, तुकाराम वाळके, रामू मोरे, दादा शेख, गणेश मगर, पोलिस पाटील विलास मगर ,संदीप मगरसह अनेक ग्रामस्थांनी आग विझविण्यास मदत केली.