Wed, Sep 23, 2020 21:58होमपेज › Aurangabad › नागपूर- मुंबई महामार्गावर ट्रक, टँकरचा अपघात

नागपूर- मुंबई महामार्गावर ट्रक, टँकरचा अपघात

Published On: Jan 29 2019 11:55AM | Last Updated: Jan 29 2019 11:49AM
बोर दहेगाव : प्रतिनिधी

बोर दहेगाव येथील शेड फाटा या ठिकाणी सकाळी ७:३० वाजता वैजापूरकडे जाणारा ट्रक आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा भारत गॅसचा भरलेला मोठा टँकर यांच्यात नागपूर- मुंबई महामार्गावर बोर दहेगाव शेड फाटा येथे भीषण अपघात घडला. या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे.

तब्बल २:३० तास होऊन गेले तरी घटनास्थळी कुठलीही यंत्रणा मदतीला आलेली नव्हती. गँसचा टँकर हा भरलेला असल्याने गँस गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकर या ठिकाणी मदतीची गरज आहे. आणि दोन्हीही वाहने नागपूर महामार्गावर अपघात स्थळीच असल्याने इतर वाहनांना वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झालेली आहे. 

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे.