Tue, Jul 14, 2020 02:53होमपेज › Aurangabad › मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा : आमदार भुमरे 

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा : आमदार भुमरे 

Published On: Jul 25 2018 6:53PM | Last Updated: Jul 25 2018 6:44PMपैठण : प्रतिनिधी

मराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार संदिपान पा. भुमरे यांनी मुख्यमंत्र्याना दिला. भुमरे यांनी यासंबधीचे निवेदनही दिली आहे.

आमदार भुमरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसापासून आरक्षणासाठी मराठा समाजाचे राज्यभरात तीव्र आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत अशा गंभीर प्रसंगी शासनाने तात्काळ या वर्गाचा ओबीसीत समावेश करण्याचे गरजेचे आहे. शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे याने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली  व देवगाव रंगारी येथिल जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राषन केले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांमुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली असुन आदोलन तिव्र होण्याची भीती आहे. 

यामुळे मराठा समाजाचा तात्काळ ओबीसीत समावेश करावा. आणि आरक्षण लागु होऊ पर्यंत शासनाने काढलेली 72 हजाराची मेगाभरती स्थगित करावी अन्यथा मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरावे लागेल व होणाऱ्या परिणामाला शासन जबाबदार राहील असा इशारा आमदार भुमरे यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्याना दिला आहे.