Fri, Nov 27, 2020 11:01



होमपेज › Aurangabad › चारच नव्हे पुढची अनेक वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार

चारच नव्हे पुढची अनेक वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार

Last Updated: Nov 22 2020 4:43PM




औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा  

कोविड नसता आपल्या सरकारने फार मोठी भरारी घेतली असती. पण असो आपल्याकडे भरपूर संधी आहे. पुढची चार वर्षच नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार टिकणार आणि चांगले काम करणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आभासी पध्दतीने औरंगाबाद मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी शहरातील दोन हॉटेल आणि एक नाट्यगृह अशा तीन ठिकाणी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी मोठे स्क्रिन लावण्यात आली होती.

वाचा : औरंगाबाद : अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन 

वाचा : माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम!