Sat, Aug 08, 2020 03:33होमपेज › Aurangabad › मनसेने गेटला लावले कुलूप; कर्मचाऱ्यांनी लढवली युक्ती

मनसेने गेटला लावले कुलूप; कर्मचाऱ्यांनी लढवली युक्ती

Published On: Jul 07 2018 12:27PM | Last Updated: Jul 07 2018 12:39PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगपुरा भागातील कचरा उचलला जात नसल्याच्या विरोधात मनसेच्यावतीने शनिवारी सकाळपासून मनपा मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संतप्‍त कार्यकर्त्यांनी 10 वाजेपासूनच मुख्य प्रवेशद्वारात बसून आत ये-जा करण्यास मज्जाव केला आहे. एवढेच नव्हे मुख्य प्रवेशाद्वाराशेजारील छोट्या गेटलाही कुलूप ठोकण्यात आले आहे. यामुळे मनपाचे अधिकारी कर्मचारी मागच्या दाराने आत गेले असून पालिकेचे कामकाज सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान मनसेने आक्रमक आंदोलन पुकारल्यामुळे मनपा प्रशासनाची गोची झाली आहे. इकडे मनसेचे आंदोलन सुरु आहेत तर मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची वरिष्ठ अधिकारी किंवा पदाधिकारी यापैकी कोणीही भेट न घेतल्याने हे आंदोलन सुरूच आहे.