Tue, Aug 11, 2020 21:35होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षण रद्द करा : 'एमआयम' आमदार इम्तियाज जलील यांची न्यायालयात धाव  

मराठा आरक्षण रद्द करा : 'एमआयम' आमदार इम्तियाज जलील यांची न्यायालयात धाव  

Published On: Jan 05 2019 12:47PM | Last Updated: Jan 05 2019 12:47PM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्यात यावे यासाठी 'ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहाद उल मुसलीमीन' (एमआयएम) आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. 
राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल दिल्यानंतर  मराठा समाजाला एसईबीसी वर्ग निर्माण करून १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.

जलील यांनी ॲड सतीश तळेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण प्रलंबित आहे, अजूनही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, मुस्लिम आरक्षण डावलले जात आहे, मुस्लिम समाजासाठी आरक्षण मंजूर करण्यात यावे अशी मागणी जलील यांनी याचिकेतून केली आहे.