Fri, Jul 10, 2020 02:36होमपेज › Aurangabad › ‘एमआयएम’चा नगरसेवक सय्यद मतीन याला अटक

‘एमआयएम’चा नगरसेवक सय्यद मतीन याला अटक

Published On: Aug 18 2018 12:01PM | Last Updated: Aug 18 2018 12:01PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध करत मनपा सभागृहात चिथावणीखोर भाष्य केल्याबद्दल सय्यद मतीन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काल महानगरपालिकेच्या सभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध केला. तेव्हा विरोध केल्याच्या कारणावरुन भाजप नगरसेवकांनी सभागृहातच मारहाण केली होती. त्यानंतर एमआयएमच्या कार्यकत्यांकडून भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेकही झाली. यामुळे औरंगाबादमध्ये तणावपूर्ण वातावरण बनले होते.

दरम्यान, नगरसेवक सय्यद मतीन याला अटक करण्यात आली असून काल झालेल्या मारहाणीत जखमी असलेल्या मतीनवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.