Mon, Jul 13, 2020 12:37होमपेज › Aurangabad › #MeToo एम. जे. अकबर यांची हकालपट्टी करा : पृथ्वीराज चव्हाण

#MeToo एम. जे. अकबर यांची हकालपट्टी करा : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Oct 13 2018 6:08PM | Last Updated: Oct 13 2018 6:10PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राजकारणात येण्याआधी अनेक माध्यम संस्थांमध्ये संपादक राहिलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप होऊनही केंद्र सरकार त्यांना निर्लज्जपणे परत येण्यास सांगत आहे. अशा मंत्र्याच्या राजीनाम्याची वाट न पाहता हाकलून द्यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

राजकारणात येण्यापूर्वी अनेक माध्यम संस्थांमध्ये संपादक राहिलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर #MeToo मोहिमेतून नऊ महिला पत्रकारांनी अत्याचाराचे आरोप केले आहेत. सध्या ते नायझेरियाच्या दौऱ्यावर आहेत. 

काँग्रेसतर्फे मराठवाडा विभागाची दुष्काळी परिस्थितीवर चर्चा व चिंतन बैठक शनिवारी झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता अकबर यांना ताबडतोब पदावरून हाकलून लावण्याची मागणी केली.