Sat, Nov 28, 2020 19:00होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत हा शेवटचा 'जनता कर्फ्यू' : उद्योगमंत्री

औरंगाबादेत हा शेवटचा 'जनता कर्फ्यू' : उद्योगमंत्री

Last Updated: Jul 07 2020 7:35PM

पालकमंत्री सुभाष देसाईं औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावणे अडचणीचेच आहे. परंतु, शहरासह औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. ही साखळी तोडणे देखील तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळेच प्रशासनाला 'जनता कर्फ्यू'ची सूचना करण्यात आली असून, येत्या १० ते १८ जुलै दरम्यान शहरात कडक स्वरुपाचा जनता कर्फ्यू राहणार आहे. नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात येत असून हा शेवटचा जनता कर्फ्यू राहिल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी  'पुढारी'शी बोलताना सांगितले.

वाचा :  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांवर 

शहर व वाळूज परिसरात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सखोल चर्चा करून १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाला आपणच सूचना केली होती. तसेच यात एमआयडीसी परिसरातील कंपन्याही बंद ठेवण्यास आपली सहमती असल्याचेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. दरम्यान या जनता कर्फ्यूमध्ये दुकाने, खासगी आस्थापनांसह सर्व यंत्रणा बंद राहणार आहेत. 

खर तर लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू असो की, बंद असो. यामुळे अडचणी येतात हे वास्ताव आहे. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे. आता अचानक कर्फ्यू लावल्याने नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांची परवड होऊ नये, त्यांना घरातच राहता यावे, हा विचार करूनच नागरिकांना जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) बाबत चार दिवस आधीच संपूर्ण शहरवासियांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे. दरम्यान या बंद काळात महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात अधिकाअधिक नागरिकांशी संपर्क करून त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यातून रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

वाचा : औरंगाबाद: हतनुरात कोरोनाचा शिरकाव

९ दिवस घरातच रहा

शहरवासियांच्या सुरक्षतेचा विचार करून येत्या १० जुलैपासून शहर व औद्योगिक वसाहत परिसरात ९ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे. नागरिकांनी हा कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी करावा. कोणीही घरातून बाहेर निघू नये, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

वाचा : औरंगाबाद : शहरात केवळ दूध, पेपर वाटण्यास परवानगी