Sat, Jul 11, 2020 20:21होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : काकासाहेब शिंदेवर कायगाव टोका येथे अत्यंसंस्कार

काकासाहेब शिंदेवर कायगाव येथे अत्यंसंस्कार

Published On: Jul 24 2018 5:22PM | Last Updated: Jul 24 2018 5:34PMगंगापूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलनात मृत झालेल्या काकासाहेब शिंदे याच्यावर आज, मंगळवारी अंत्यसंस्‍कार करण्यात आले. यावेळी हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या तिरावर सकाळी ११.३० वाजता अंत्यविधी झाला. विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्‍थित होते. दरम्यान, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आंदोलकांनी मारहाण केल्याणे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

काकासाहेब शिंदे याचे शवविच्छेदन झाल्यानंतर आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हारूग्णालय गंगापूर येथून अत्यंयात्रा काढण्यात आली. कायगाव येथे सकाळी ११ वा. च्या सुमारास अंत्ययात्रा आल्यानंतर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी आले. यावेळी आंदोलकांनी खैरे यांना अंत्ययात्रेतून निघून जाण्याचे आवाहन कले. त्यानंतर जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थीती हाताबाहेर जात असल्यामुळे सेनेचे नेते, शिवसैनिक व पोलिसांनी सुरक्षा कवच तयार करत खैरे यांना वाहनापर्यंत आणून प्रक्षुब्ध जमामावातून सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये काही नेता नेत्यांना नागरीकांच्या रोषाचा सामना करत मार खावा लागला.

खासदार खैरे कायगाव येथून निघून गेल्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास काकासाहेब शिंदे याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आंदोलनकर्ते व नागरिकांनी गोदावरी पुलावर ठाण मांडले. काही वेळाने औरंगाबाद महापालिकेच्या अग्निशमन विभागाची बंब व आग विझविण्याची लहान गाडी गोदावरी पुलावर आल्यानंतर आंदोलकांना वाहनातून आपल्यावर पाणी मारणार असल्याची शंका आली. त्यामुळे जमावाने वाहनातील कर्मचा-यांना छोट्या वाहनांतून उतरवून दिले व त्याची नासधूस करत पलटी करून पेटवून दिली. यामध्ये जीप्सी हे वाहन जळून खाक झाले आहे़. तर दुसरा मोठा अग्निशमन बंब सुरक्षित बाहेर काढून दिला. 

या घटनेतनंतर पोलिस अधीक्षक आरती सिंह जमावाला शांत करण्यासाठी जात असताना जमावाने पोलिसांच्या दिशेने दगड, लाकडी दांडे, चप्पल, बुट फेकण्यास सुरवात केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी खंडागळे जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यात पाच टाके पडले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एक कर्मचारी शाम काटगावकर यांना -ह्दयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना औरंगाबाद शहरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदोलन करणा-याची संख्या कायगाव टोका येथे वाढत असल्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामुळे आंदोलकांमधून पोलिसांबद्दल असंतोष व्यक्‍त होत आहे. 

विविध पक्षाच्या नेत्यांचा काढता पाय

अंत्यसंस्कारादरम्यान खासदार खैरे यांना मारहाण झाल्यानंतर अत्यसंस्कारासाठी आलेल्या इतर पक्षाच्या नेत्यांनीही तेथून काढता पाय घेतला. पुलावर  जलसमाधी आंदोलनाचे आयोजक तथा माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, युवा सेना जिल्हाधिकारी संतोष माने, डॉ. ज्ञानेश्वर निळ यांच्यासह हजारोच्या संख्येने जमाव पुलावर आंदोलन करत आहे़

वाहनाच्या लांबच लांब रांगा

गेल्या दोन दिवसांपासून येथे पुलावर आंदोलन सुरु आहे. पुलावरून वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तसेच प्रवरा संगम गावाकडूनही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.