Wed, Jul 08, 2020 17:33होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : 'घाटी'त डॉक्टरला मारहाण; डॉक्टर संपावर

औरंगाबाद : 'घाटी'त डॉक्टरला मारहाण; डॉक्टर संपावर

Published On: Apr 26 2018 1:59AM | Last Updated: Apr 26 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) रात्री साडेबाराच्या दरम्यान रुग्णाच्या तीन ते चार नातेवाईकांनी सर्जीकलचे निवासी डॉक्टर हर्षल चव्हाण यांना मारहाण केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेने संतापून निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. 

अपघात विभागात रात्री ड्युटीवर असताना रुग्णाच्या तीन ते चार नातेवाईकांनी डॉक्टर हर्षल चव्हाण यांच्याशी हुज्जत घातली व त्यांना मारहाण केली. डॉक्टर हर्षल चव्हाण हे सर्जीकल विभागाचे असून डॉक्टर सुरेश हरबडे यांच्या युनीट मधील आहे. घटनास्थळी गोंधळ सुरु असताना डॉक्टर हरबडे तेथे आले. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांनाही दमबाजी करून धावून गेले. ही घटना निवासी डॉक्टरांना समजताच सर्व वार्डामधील डॉक्टरांनी काम थांबविले व अपघात विभागासमोर जमा होऊन घोषणाबाजी सुरु केली.

डॉक्टरांनी संप पुकारताच अधिस्टता डॉ. कानन येलीकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ भारत सोनोने हे घटनास्थळी हजर झाले. निवासी डॉक्टर ऐकण्याच्या तयारीत नसल्याने त्यांनी एमर्जनशी सेवा लागू केली सर्व विभागप्रमुखांसह डॉक्टरांना बोलाविण्यात आले असून रुग्णसेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे.

Tags : aurangabad, Ghati, doctor