होमपेज › Aurangabad › सिल्लोडमध्ये तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस; १० धरणांपैकी ८ ओव्हरफ्लो

सिल्लोडमध्ये तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस; १० धरणांपैकी ८ ओव्हरफ्लो

Published On: Sep 20 2019 12:05PM | Last Updated: Sep 20 2019 11:33AM

पूर्णा नदी पूराच्या पाण्याने अशी खळखळून वाहत आहे. छाया : मन्सूर कादरीसिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड शहरासह तालुक्यात गुरूवार (दि.१९) रोजी रात्री झालेल्या पावसामुळे आतापर्यंत सरासरी ६७१.८५ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी ६५० मिमी झाली असून या पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक अंभई तर सर्वात कमी बोरगाव बाजार मंडळात पाऊस झालेला आहे. चार मंडळात अधिक झालेल्या पावसामुळे पूर्णा, जूई, चारणा, नागझरी, वाघूर अशा लहान- मोठया सर्वच नद्यांना पूराचे पाणी आले असून नदी आणि नाले खळखळून वाहण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील १० धरणांपैकी ८ ओव्हरफ्लो झाले असून उंडनगाव व रहिमाबाद ओव्हरफ्लोच्या मार्गावर असले तरीही निल्लोड धरण मात्र अद्यापही जोत्याच्या खालीच आहे.

बुधवार (दि.१८) रोजी रात्री सिल्लोड व निल्लोड दोन मंडळ वगळता तालुक्यात जोरदार पाऊस झाला. आमठाना मंडळात ९५ मिमी व अजिंठा मंडळामध्ये ६२ मिमी पाऊस झाल्याने त्या भागातील अनेक गावांत पाणी शिरले होते.

अंभई ९९१ मिमी, गोळेगाव ८६१ मिमी, अजिंठा ७६८ मिमी आणि आंमठाना ७४९ मिमी पाऊस मंडळात सरासरीपेक्षा अधिक झाला असून सिल्लोड, निल्लोड, भराडी व बोरगाव बाजार या चार मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.