मला रावसाहेब दानवेंचा जावई म्हणून नका : हर्षवर्धन जाधव

Last Updated: Aug 21 2020 1:04AM
Responsive image
कन्नडचे माजी आमदार तथा जावई हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे


औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोट देण्याच्या निर्णय मी घेतला आहे. औरंगाबाद कौटुंबिक न्यायालयात मी घटस्फोटाचा दावा दाखल केला असून या पुढे मला रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून कोणीही संबोधू नये, असे आवाहन कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १०८ रुग्णांची वाढ

भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे. याच्या आधी जाधव यांनी कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा गंभीर आरोप दानवेंवर केला होता. या आरोंपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच होती. 

औरंगाबाद : धारकुंड धबधब्यात बुडालेलेल्या तीन तरुणांचे मृतदेह मिळाले 

दरम्यान, जावई जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत, त्यात दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली होती. त्यात जाधव यांनी, या दोघांनी आपणास वेडा ठरविण्याचा विडा उचलला असून, प्रत्यक्षात तेच वेडे आहेत, अशी टीका केली होती. या होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे कन्नडमध्ये सासरा-जावयांचा आणखी राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.