होमपेज › Aurangabad › हाळम येथे ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पशु आरोग्य शिबीर

पशू आरोग्य शिबिराचे आयोजन

Published On: Jul 22 2019 4:23PM | Last Updated: Jul 22 2019 4:23PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे हाळम येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता भव्य पशु आरोग्य शिबीर व लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिबीराचे मुख्य संयोजक राष्ट्रवादीचे युवा नेते तथा हाळम ग्रामपंचातय सदस्य माधव मुंडे यांनी दिली. 

ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या या शिबीराचे उद्घाटन जि. प. सदस्य अजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ. उ. बा. समितीचे सभापती अ‍ॅड. गोविंद फड तर प्रमुख पाहुणे म्हणून रा.यु.काँ.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, युवा नेते रामेश्‍वर मुंडे, लक्ष्मण पौळ, प्रा. मधुकर आघाव, बाजीराव धर्माधिकारी, मोहन सोळंके, बालाजी मुंडे, सुर्यभान मुंडे, माणिक फड, माऊली गडदे, संतोष शिंदे, आयुब पठाण यांची उपस्थित राहणार आहेत. 

तसेच डॉ. धनाजी देशमुख, डॉ. विठ्ठल मुंडे, डॉ. अशोक फड, डॉ. श्रीकृष्ण कोळी आदी तज्ञ डॉक्टरांमार्फत जनावरांची तपासणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे. या शिबीरात जनावरांना घटसर्प, लसीकरण करण्यात येणार आहे. पशुवैद्यकिय दवाखाना हाळम येथे दि.२४ रोजी होत असलेल्या या शिबीराचा सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक राष्ट्रवादीचे युवा नेते तथा हाळम ग्रामपंचात सदस्य माधव मुंडे यांनी केले आहे.