Mon, Jul 06, 2020 17:44होमपेज › Aurangabad › गो एअर कंपनीच्या विमानाचे औरंगाबादेत इमरजन्सी लँडिंग 

गो एअर कंपनीच्या विमानाचे औरंगाबादेत इमरजन्सी लँडिंग 

Published On: Jun 02 2019 7:19PM | Last Updated: Jun 02 2019 7:20PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

पटना येथून मुंबईला जाणार्‍या गो एअर कंपनीच्या विमानात अचानक बिघाड झाल्याने विमानचालकाने औरंगाबादेत इमरजन्सी लँडिग करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार सायंकाळी 5 च्या सुमारास विमानाने औरंगाबाद विमानतळावर इमरजन्सी लँडिग केले. यामुळे विमानातील 164 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली. 

याविषयी अधिक माहिती अशी की, पाटण्याहून मुंबईकडे निघालेल्या गो एअर कंपनीच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आकाशात विमानाला अचानक झटके बसले. यामुळे प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रसांगवधान राखून वैमानिकांनी प्रवाशांना धीर दिला. तसेच औरंगाबादेतील विमानतळावर एअन ट्रफिक कमी असल्यामुळे या ठिकाणी इमरजन्सी लँडिग करण्याचा सल्ला मुंबई विमानतळावरून मिळाला. 

त्यानुसार वैमानिकांने औरंगाबादेत संपर्क साधून इमरजन्सी लँडिग केले. या विमानामध्ये 164 प्रवासी प्रवास करत होते. विमानचालकाच्या सतर्कतेमुळे 164 प्रवाशांचे प्राण वाचले. विमान लँड होताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.