Thu, Jul 09, 2020 23:32होमपेज › Aurangabad › मुलीने केले आईचे अंत्यसंस्कार

मुलीने केले आईचे अंत्यसंस्कार

Published On: Jan 19 2019 9:20PM | Last Updated: Jan 19 2019 9:20PM
पिशोर (औरंगाबाद) : प्रतिनिधी

हिंदू संस्कृतीमध्ये आई किंवा वडील यांच्या चितेस केवळ मुलग्याने अग्नी देण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. एखाद्या चित्रपटात मुलीने आई किंवा वडिलांचे अंत्यसंस्कार केल्याचे दृश्य पाहायला मिळते. असेच काहीसे दृश्य प्रत्यक्षात पिशोर (ता.कन्नड) येथे शनिवारी (दि.१९) पहावयास मिळाले. येथे सावत्र मुलगी अहिल्याबाईने आईच्या पार्थिवास अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. 

पिशोर (ता.कन्नड) येथील शफेपूर भागात राहणाऱ्या मंडाबाई विठ्ठल मोकासे (वय ९० ) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मंडाबाईना सात स्वतःच्या व दोन सावत्र मुली आणि दोन सावत्र मुलगे आहेत. परंतु सावत्र मुलांनी भडाग्नी न देता मंडाबाईंची मुलगी अहिल्याबाई बाजीराव बोराडे (रा.उंडणगाव) यांनी आईच्या पार्थिवास भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. या सर्व विधींचा व्हिडीओ सोशल मिडियावर आल्याने संपूर्ण गावात या घटनेच्या चर्चेस उधाण आले. 

आजच्या युगात पुरुषाच्या खांद्यास खांदा भिडवून आजची महिला कोणत्याही क्षेत्रात कतृत्व बजावत आहे. येथे वंशाला दिवा असतानाही आईच्या मृतदेहाला मुलींनीच खांदा देत भडाग्नी दिल्याने नवयुगाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे या प्रसंगावरून समोर येत आहे.