औरंगाबाद : प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.६) सकाळी शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. यात नगररचना विभागातील अर्ध्याहून अधिक महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले. महत्वाचे रोकॉर्ड खाक झाल्याने या प्रकाराची चौकशी होणार आहे.
नगररचना कार्यालयात शहरातील अनेक मोक्याच्या मालमत्तांचे रेकॉर्ड आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामुळे रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे शक्य होते. हे कार्यालय येथून हलवावे यासाठी भूमाफिया प्रयत्नशील होते. चार वर्षपूर्वी या कार्यालयास आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.
घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे.