Sat, Jul 11, 2020 09:31होमपेज › Aurangabad › औरंगाबाद  : 'फायर ब्रिगेड'च्या सुरेंची मनसे उपाध्यक्षाला हात-पाय तोडण्याची धमकी

औरंगाबाद  : 'फायर ब्रिगेड'च्या सुरेंची मनसे उपाध्यक्षाला हात-पाय तोडण्याची धमकी

Last Updated: Jul 02 2020 7:55AM
औरंगाबाद  : पुढारी वृत्तसेवा

मनपा अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांच्या वादाचा दुसरा अध्याय सोमवारी (दि. २९) समोर आला. कोरोना रूग्ण आढळल्यावर फवारणीसाठी या असा फोन करणाऱ्या मनसे जिल्हा उपाध्यक्ष ललित सरदेशपांडे यांना अग्निशामक दलाचे प्रमुख राजू सुरे आणि त्यांचा मुलगा दिलीप सुरे यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

औरंगाबादेत कोरोना संकट कायम, नवे २०२ रुग्ण

काही दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे हे मनपा उपायुक्तांडे कोरोना रोखण्यात मनपा कमी का पडते याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तेव्हा दशरथे यांनी डोक्यात खुर्ची घालण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा वाद शमतो ना शमतो तोच सोमवारी अग्निशामक दलाचे प्रमुख राजू सुरे आणि मनसे उपाध्यक्ष ललित सरदेशपांडे यांच्यात वाद उफाळून आला. मयुरपार्क भागात कोरोना रूग्ण आढळल्यावर सरदेशपांडे यांनी सुरे यांना फोन करून फवारणीसाठी येण्याची विनंती केली. संपूर्ण दिवस गेला तरी अग्निशामक दलाची गाडी काही आली नाही. त्यामुळे सरदेशपांडे हे उशिरापर्यंत फोन करीत राहिले. अखेर रात्री त्यांच्यात फोनवरच वाद सुरू झाला. 

औरंगाबाद : शिवसेनेच्या नगरसेवकाला कोरोना

सरदेशपांडे यांनी फोन करून साहेब, १२ तास झाले रूग्ण सापडून आणखी किती वेळ लागणार, फवारणी नाही की परिसर सील नाही. सकाळपासून फोन करतोय तुमचा कोणीही कर्मचारी इकडे आलेला नाही, असे सांगितले. त्यावर सुरे हे आम्हाला वार्ड अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेल्या यादीप्रमाणे काम करावे लागते. उद्या सकाळीच येतो मी. मी इथलाच आहे, हर्सूलचा. मी काही दुसरीकडचा नाही असे म्हणाले. बोलता-बोलता त्यांच्यात वाद वाढला. त्या वादादरम्यानच सरदेशपांडे यांना सुरे यांनी धमकावले. 

औरंगाबाद : जेल अधीक्षक पुन्हा तोंडघशी; कैदी पळाल्याचा अखेर गुन्हा नोंद

म्हणे, हर्सूल ही आमचीच जमीन

ललित सरदेशपांडे यांना धमकावताना सुरे यांनी हर्सूल ही आमचीच जमीन आहे. तू जिथे राहतो ती सर्व जमीन आमची आहे. मी सकाळी येतो आणि तुझ्या आईला, पत्नीला समजावून सांगतो. मी कोण आहे? अशी धमकीची भाषा वापरली. तसेच, तू आम्हाला नीट ओळखत नाहीस. आमचे सर्व नाते-गोते आहेत. हरामखोर, खामोश बैस अशी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

मुलानेही फोन करून धमकावले

राजू सुरे रात्री घरी असताना सरदेशपांडे यांच्याशी वाद झाला. हा प्रकार सुरे यांचा मुलगा दिलीप याला समजला. त्याने लगेच ललित यांना फोन करून म्हताऱ्याला काय फोन करतोस, अशी विचारणा करत सरदेशपांडे यांना धमक्या देणे सुरू केले. तसेच तुला बघतो, हात-पाय तोडतो अशी धमकीही दिली. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. यात फिर्यादी हे कोर्टात दाद मागू शकतात. तरीही ललित आणि सुरे यांना बोलावून घेऊन नेमकं प्रकरण काय? हे पाहू. गांभीर्य पाहून पुढील कारवाई करू.
- पोलिस निरीक्षक इंगोले, हर्सूल ठाणे