Thu, Jan 21, 2021 15:49होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांवर 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांवर 

Last Updated: Jul 07 2020 10:48AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद :  पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.७) सकाळी ७७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ७२ तर ग्रामीण भागातील ०५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ३७ पुरूष तर ४० महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७०७१ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झाले आहेत. 

अधिक वाचा : औरंगाबाद : शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या 

३१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ३१२८ जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज ७७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबाद मनपा हद्दीतील ७२ रुग्ण सापडले आहेत तर ग्रामीण भागात ५ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.