Thu, Jul 09, 2020 23:01होमपेज › Aurangabad › कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: May 28 2019 9:09PM | Last Updated: May 28 2019 9:09PM
पिशोर : प्रतिनिधी

खातखेडा (ता. कन्नड) येथील शेतकऱ्याच्या मुलाने कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी याला कंटाळून आत्महत्या केली.

सारंगधर बाबुराव पवार (वय ४६ रा. खातखेडा) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या विषयी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपासून पडणारा दुष्काळ, शेतीतील कायमची नापिकी, मुलीच्या लग्नाचा खर्च, बँकेचे कर्ज व मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज यांची वेळेत परतफेड न करता आल्याने नैराश्यातून शनिवारी (दि.२५) खातखेडा (ता.कन्नड) येथे शेतवस्तीवर राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी (दि.२८) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. मंगळवारी (दि.२८) त्यांच्यावर येथील शेतवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.