Tue, Aug 11, 2020 22:25होमपेज › Aurangabad › कन्नड मतदारसंघातून आठ उमेदवार रिंगणात तर सहा जणांची माघार  

कन्नड मतदारसंघातून आठ उमेदवार रिंगणात तर सहा जणांची माघार  

Published On: Oct 08 2019 1:29AM | Last Updated: Oct 07 2019 7:30PM
कन्नड : प्रतिनिधी
कन्नड विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ पैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन विधाते यांनी दिली आहे. 

कन्नड विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल होते. सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून राजेंद्र राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसन्ना पाटील या नाराज उमेदवरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये संबधीत पक्षांना यश मिळाले तर भाजपचे संजय गव्हाणे यांनी ही माघार घेतली. परंतु , किशोर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवली. यामुळे निवडणूक रिंगणात आठ उमेदवार राहिले आहेत. 

या उमेदवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतोष किसनराव कोल्हे, अपक्ष हर्षवर्धन जाधव, शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत, अपक्ष किशोर नारायण पवार, वंचित आघाडी कडून मारोती राठोड,  भारतीय किसान पक्षाचे सुनील चव्हाण, अपक्ष अंबादास सगट, अपक्ष विठ्ठल थोरात या  उमेदवारांचा सामावेश आहे. तर  संजय गव्हाणे, प्रसन्ना पाटील, राजेंद्र राठोड, पुनमताई राजपूत, भरत जाधव, याकूब शेख या सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.