Wed, Jul 15, 2020 23:53होमपेज › Aurangabad › कापूस फुटल्याने वेचनीला मजूर मिळेना

कापूस फुटल्याने वेचनीला मजूर मिळेना

Last Updated: Nov 19 2019 1:27AM

सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरात सर्वत्र कपाशी बोड फुटल्याने शेतातील कपाशीला शेतभर पांढराशालू पांगरल्याचे स्वरूप आले आहेत.अंधारी : प्रतिनिधी 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात आठवडाभरापासून अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतातील फुटलेल्या कपाशीची वेचणीची लगभग शेतकर्‍यांना लागली आहे. काही शेतातील थोड्या फार प्रमाणात राहिलेला मका  पिकाची कापनी तसेच काढणीलासुध्दा वेग आल्याने शेतमजूर व्यग्र झाले आहेत. यामुळे फुटलेल्या कशी वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यावर मजूर शोधण्याची वेळ आली आहे.

मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कपाशी व मका, बाजरी, सोयाबीन पिकांचे मोठया प्रमाणत नुकसान झाले होते. अवकाळी पावसात शेत चिखलमय झाले होते. यामुळे कपाशीचे बोंड फुटले नव्हते. परंतू, मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस उघडला आहे. त्यामुळे तापत्या उन्हात कपाशी बोंड फुटल्याने शेतातील कपाशीला शेतभर पांढराशालू पांगरल्याचे स्वरूप आल्याने कपाशी वेचणी करण्याची लगभग शेतकर्‍यांना लागली आहे. 

मी दोन एकर शेतात मका केला आहे परंतू अवकाळी पाऊसाने शेतातील कपाशिचे पिक खराब झाले असून, उरले सुरले कपाशीचे बोंड फुटल्याने कपाशी वेचण्या करता मजुर मिळत नाहीत. दररोज कपाशी वेचण्या करीता मजुर शोधण्याची वेळ आली आहे.
- अण्णाभाऊ पांडव