Sat, Dec 07, 2019 10:30होमपेज › Aurangabad › मुलाच्या मृतदेहाशेजारी 3 दिवस बसून असलेल्‍या आईचा मृत्यू 

मुलाच्या मृतदेहाशेजारी 3 दिवस बसून असलेल्‍या आईचा मृत्यू 

Published On: May 22 2018 2:24PM | Last Updated: May 22 2018 2:24PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्‍या तीन दिवसांपासून घरात मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून राहिलेल्या मनोरुग्ण आईचाही घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुढीलेन येथील शालिग्राम तुळशीराम बाखरे यांचा तीन दिवसांपूर्वी अज्ञात कारणाने मृत्यू झाला होता. 

बाखरे हे पडेगाव येथील पावर हाऊस मागील गणेश नगरात 20 वर्षांपासून राहात होते. 20 बाय 30 चा प्लॉटवर बांधलेल्या घरात मनोरुग्ण असलेल्या आईसोबत राहून ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तीन दिवसांपूर्वी घरातच अज्ञात कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मनोरुग्ण असलेल्या आई देवकाबाई तुलशीराम बाखरे (90) यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले नाही. त्या तीन दिवसांपासून मृतदेहाशेजारीच पडून होत्या. सोमवारी सकाळी शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी घेऊन गेला असता ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी उपचारासाठी त्‍यांना तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. 

 

Tags :  aurngabad,  mother, dead body