Sat, Jul 11, 2020 11:00होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत ४ जुलैपासून संचारबंदी (video)

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत ४ जुलैपासून संचारबंदी (video)

Last Updated: Jul 02 2020 7:55AM

जिल्हाधिकारी उदय चौधरीऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी वाळूजसह ७ ग्रामपंचायतीमध्ये येत्या ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी लावण्यात येणार आहे. यात केवळ आरोग्यसेवा आणि दूध विक्रीची दुकाने ठराविक कालावधीत सुरु राहतील तसेच मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरु झालेले उद्योगही सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अधिक वाचा :औरंगाबादेत कोरोना संकट कायम, नवे २०२ रुग्ण

यावेळी मनपा आयुक्त आस्तिक पांड्ये, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्यात सोमवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यात लोकप्रतिनिधींनी वाळूज एमआयडीसीतील वाढत्या रूग्ण संखेवर चिंता व्यक्त केली. तसेच सरपंच आणि या परिसरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या मागणीवर चर्चा झाली. त्यानुसार वाळूजमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ४ ते १२ जुलैदरम्यान संचारबंदी लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचा :अन् डॉक्टरांनी 'त्याला' आईचे अंत्यदर्शन घडविले!