Fri, Jul 03, 2020 04:30होमपेज › Aurangabad › औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे सत्र सुरूच, कोरोनाचा ६२ वा बळी 

औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे सत्र सुरूच, कोरोनाचा ६२ वा बळी 

Last Updated: May 27 2020 9:53AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

मकसूद कॉलनी येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मंगळवारी (दि.२६ रात्री १२.२० मिनिटांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला १९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० रोजी स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कोविड, निमोनिया विथ मल्टीऑर्गन फेल असे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी जाहीर केले.

याच्या आधी घाटीत रूग्णालयात उपचार सुरू असताना इंदिरानगर बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष आणि हुसेन कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हुसेन कॉलनी येथील ३८ वर्षीय तरुणाला २४ मे रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. दम लागणे, छातीत दुखणे, ताप, खोकला ही लक्षणे असल्यामुळे कोविड संशयित म्हणून उपचार सुरू करण्यात आले. त्याचदिवशी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. २५ मे रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान २६ रोजी रात्री ७.३० वाजता मृत्यू झाला. या पूर्वी त्याला सी ओपीडी अर्थात फुफुस व श्वास संदर्भातील आजार होता. 

औरंगाबाद : पश्चिम बंगालच्या मजुरांनी दिल्या जय महाराष्ट्रच्या घोषणा (व्हिडिओ)

इंदिरानगर बायजीपुरा येथील ५६ वर्षीय रुग्णाला देखील २५ रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता मृत्यू झाला. मृत्यू नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मृत्युमुळे औरंगाबादेतील कोरोना बळींची संख्या ६१ वर गेली आहे.

तर आज सकाळी ३० पॉझिटिव्ह रूग्णांची यात वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३६० एवढी झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये गंगापुर (१), मिसारवाडी (१), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (१), शहानवाज मस्जिद परिसर (१), सादात नगर (१), भवानीनगर, जुना मोंढा (१), जुना बाजार (१), जहांगीरदार कॉलनी (२), ईटखेडा परिसर (१), जयभिम नगर (१), शिवशंकर कॉलनी (२), सुभाषचंद्र बोस नगर (४), अल्तमश कॉलनी (१), शिवनेरी कॉलनी एन-9 (१), टिळक नगर (१), एन-4 सिडको (१), रोशन गेट परिसर (१), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), भाग्यनगर (१), जय भवानी नगर (३), समता नगर (१), सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ०९ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादेत २२ कोरोना रुग्णांची भार 

ग्रामीण मधील दोन रुग्ण 

सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यातील दोन रुग्णांना कोरोना झाला आहे. या रुग्णांवर घाटीत उपचार सुरू आहेत.