होमपेज › Aurangabad › कचर्‍यासाठी वाळूजच्या कंपनीशी करार

कचर्‍यासाठी वाळूजच्या कंपनीशी करार

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचराप्रश्‍नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर मनपातील पदाधिकारी आणि प्रशासन दोघेही कामाला लागले आहेत. ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने वाळूज येथील केमिकल कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार ही कंपनी रोज मनपाचा 20 टन ओला कचरा घेणार आहे. हा कचरा मनपा स्वतःच्या वाहनांमधून संबंधित कंपनीत पोहचवणार आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा या कंपनीला प्रतिटन 750 रुपये या दराने पैसेही अदा करणार आहे.

कचराकोंडीमुळे शहराची राज्यभरात नाचक्की झाली. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 19 एप्रिल रोजी त्यांच्या औरंगाबाद दौर्‍यात मनपातील पदाधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच शहरात पडलेला कचरा कधीपर्यंत उचलला जाईल, अशी विचारणा केली. त्यावर महापौरांनी 30 एप्रिलपर्यंत हा कचरा उचलला जाईल, असे आश्‍वासन दिले. आता या दहा दिवसांत हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासन तीन दिवसांपासून कामाला लागले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पुढाकाराने सोमवारी मनपाने ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी शिवप्रसाद अग्रवाल यांच्या कंपनीसोबत करार केला. अग्रवाल यांची वाळूज येथे केमिकल कंपनी आहे. या कंपनीत गॅसची गरज असते. त्यामुळे त्यांनी कंपनीतच बायोगॅस प्रकल्प उभारलेला आहे. आता मनपा रोज या कंपनीला 20 टन ओला कचरा देणार आहे. त्याची विल्हेवाट या कंपनीतील बायोगॅस प्रकल्पात लावली जाईल. करारानुसार हा कचरा मनपा स्वतःच्या वाहनांमधून कंपनीत नेऊन देईल. तसेच कंपनीला प्रति 750 रुपये या दराने पैसेही देणार आहे. 

Tags : Aurangabad, Contract, company,  waste