Fri, Jul 10, 2020 03:30होमपेज › Aurangabad › सिल्लोड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नागरिकांचा सामूहिक योगा

सिल्लोड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नागरिकांचा सामूहिक योगा

Published On: Jun 21 2019 4:24PM | Last Updated: Jun 21 2019 4:24PM
सिल्लोड : प्रतिनिधी  

मानवाच्या शारीरिक सुदृढतेसाठी व विविध आजारांना रोखण्यासाठी मानवजातीला व्यायामासह योगा करणे अत्यंत गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या योगा कार्यक्रमात अधिकारी,  कर्मचारी व नागरिकांनी सामूहिक योगा केला.

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगाचा मुख्य कार्यक्रम सिल्लोड तालुका शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद प्रशाला व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. शहर व तालुक्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. 

यावेळी तहसिलदार रामेश्वर गोरे , गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, माजी गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके, केंद्रप्रमुख दादाराव फुसे, प्रशाला मुख्याध्यापक विजय पवार, कें.प्रा.शा. मुख्याध्यापक साळवे , संजय बागुल, सज्जन टाकसाळे, दीपक वाडेकर, गाडेकर, सुनिल हिवाळे, संजय सोनकांबळे, तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. योग गुरु म्हणून मुख्याध्यापक काकडे, पालोद व फाळके  यांनी काम पाहिले. समस्त मानवाच्या सुदृढतेसाठी आणि कल्याणासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली.