Sat, Jul 11, 2020 13:35होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: शांत शहर पुन्हा पेटले

औरंगाबाद: शांत शहर पुन्हा पेटले

Published On: May 12 2018 10:38AM | Last Updated: May 12 2018 10:38AMऔरंगाबाद: पुढारी ऑनलाईन

भीमा-कोरेगाव प्रकरणी औरंगाबाद शहरात 1 जानेवारी ते 4 जानेवारीदरम्यान दंगल उसळली होती. ही परिस्थिती शांत होताच, शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्यामुळे पुन्हा शहरात तणाव निर्माण झाला होता. टीव्ही सेंटर परिसरात पोलिसांवर पुन्हा दगडफेक करण्यात आली होती. दोन महिन्यांत शहर हळूहळू पूर्वपदावर येत असताना आता नळ कनेक्शन कट करण्यावरून गांधीनगर आणि मोतीकारंजा येथील दोन गटांत वाद उफाळून आला. किरकोळ कारणावरून पेटलेल्या या वादाचे पुन्हा दगडफेकीत रूपांतर झाले.

वाचा: औरंगाबादेत दोन गटांत धुमश्चक्री, दोघांचा मृत्यू (Video)

शांततेचे आव्हान

शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. किरकोळ कारणावरून संपूर्ण शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होते ही अत्यंत वाईट असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी देखील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.