Wed, Jul 08, 2020 08:53होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकृती बिघडली; दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकृती बिघडली

Published On: Feb 14 2019 4:10PM | Last Updated: Feb 14 2019 4:10PM
औरंगाबाद :  प्रतिनिधी 

सिंदखेड राजा येथे नगर पालिका इमारत लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी आले होते, मात्र यावेळी त्‍यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे, त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सकाळी येथे दाखल झालेले फडणवीस विमानतळावरच उपचार घेऊन हेलिकॉप्टरने मुंबईला परतले. 

सिंदखेड राजा येथून ते अकोला, वाशीमला जाणार होते. तेथून रात्री नागपूरला त्‍यांचा मुक्काम होत, पण, प्रकृती अस्‍वास्थामुळे ते अचानक मुंबईला परतले. फडणवीस यांनी सिंदखेड राजा येथेही एका डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या. तसेच औरंगाबादेतही विमानतळारील vip कक्षात स्थानिक डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केले.