Thu, Jul 02, 2020 10:37होमपेज › Aurangabad › केबल तुटल्याने ‘हाय टेन्शन’

केबल तुटल्याने ‘हाय टेन्शन’

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 1:00AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गारखेडा परिसरातील उल्कानगरीत खासगी इंटरनेट केबलचे जाळे पसरले आहे. मंगळवारी सुसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या पावसात यातील एक केबल तुटली आणि उच्च दाबाच्या विद्यूत तारेवर पडली. त्यात विद्यूत प्रवाह उतरला. त्यामुळे परिसरत काही काळ चांगलेच भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या कोणतीही जीवित हानी घडली नाही.

मंगळवारी रात्री अकरा वाजता वादळी पावसामुळे ही घटना घडली. खाजगी केबल कंपनीची एक तार तुटून विद्युत तारेवर पडली व केबलचा दुसरा भाग जवळच असलेल्या कॅफे-99 रेस्टॉरंटवर पडला. सुदैवाने हे हॉटेल लवकरच बंद झाल्यामुळे मोठा अपघात टळला. या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांनी त्वरित महावितरणच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर महावितरण कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. तुटलेल्या केबलची तार काढली. त्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला, परंतु तब्बल एक तास परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे खासगी केबलचे जाळे त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान केबल तुटून विद्युत तारेवर पडली होता. केबलचा एक भाग जवळच असलेल्या हॉटेलवर पडला. नागरिकांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधला. लाईनमन शाहीर यांनी त्वरित घटनास्थळी धावून घेऊन केबलची तार काढली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही, असे अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता नागेश देशमुख यांनी सांगितले.