Tue, Dec 10, 2019 09:51होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत भरदिवसा घरफोडी, ५० तोळे दागिने लंपास

औरंगाबादेत भरदिवसा घरफोडी, ५० तोळे दागिने लंपास

Published On: Feb 04 2019 8:39PM | Last Updated: Feb 04 2019 8:39PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थनगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून ५० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.४) दुपारी एक ते दीड वाजता घडली असल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अनिल आडे यांनी सांगितले. दरम्यान, चोरी करून दागिने व पैसे ठेवलेली बॅग घेऊन जाणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता धर्मेंद्र पुराणीक (वय ३८, रा. फ्लॅट नंबर ५, तिसरा मजला, व्यंकटेश अपार्टमेन्ट) या जाधवमंडी परिसरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला आहेत. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे बँकेत ड्युटीला गेल्या होत्या तर त्यांचा मोठा मुलगा दहावीच्या ट्युशनसाठी तर मुलगी शाळेला गेली होती. दरम्यान, पुराणीक यांच्या घरात शिरलेल्या चोरट्याने मुख्य दरवाज्याचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून चोरट्याने कपाटात ठेवलेली दागिण्यांची बॅग लंपास केली. या बॅगमध्ये ५० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १ लाख १५ हजार रुपए इतका मुद्देमाल होता.