Wed, Jul 08, 2020 11:18होमपेज › Aurangabad › सिल्लोड तालुक्यात पाच दिवसात सरासरी ७२.३७ मिमी पाऊस

सिल्लोड तालुक्यात पाच दिवसात सरासरी ७२.३७ मिमी पाऊस

Published On: Jun 28 2019 1:32AM | Last Updated: Jun 27 2019 5:59PM
सिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यात पाऊस गेल्या पाच दिवसांपासून सर्वदूर कमी जास्त प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा आनंद दिसून येत आहे. तालुक्यात पावसाचे २३ तारखेला आगमन झाले. (दि.२६) बुधवार रोजी रात्रीला शहरासह तालुक्यात साडे आठ नऊ वाज दरम्यान निल्लोड महसूल मंडळ सोडता सर्वत्र दमदार सरासरी ३०.१२ मिमी इतका पाऊस झाला आहे. या

तालुक्यात पाच दिवसात सरासरी ७२.३७ इतका पाऊस झाला आहे. गोळेगाव व अंभई मंडळात बऱ्यापैकी चांगला पाऊस झाल्याने या भागातील जुई नदीवरील सिमेंट बांधसह ईतर छोट्या- मोठ्या जलसाठ्यांमध्ये जलसाठा जमा झाला आहे. तालुक्यात नेहमीप्रमाणे ७० टक्के शेतकऱ्यांनी धुळपेरणी करून सट्टा खेळला आहे. झालेल्या या पावसामुळे केलेल्या पेरणीचा त्या शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात आठ मंडळात आतापर्यंत सरासरी ७२.३७ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वात कमी निल्लोड १८ मिमी व भराडी ३९ मिमी या मंडळात तर चांगला पाऊस गोळेगाव १५२ मिमी व अंभई ९९ मिमी मंडळात झाला आहे. ईतर ठिकाणी पावसाची हजेरी लागली असेच म्हणावे लागेल. गोळेगाव परिसरातील सिमेंट बंधारे व छोटे मोठे लहानसहान जल साठ्यात बऱ्यापैकी जलसाठा जमा झाला आहे.

सिल्लोड तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून मृग नक्षत्रासह तीन आठवडे कोरडेठाक गेले. तालुक्यात पावसाने २३ जून रोजी रात्रीला हजेरी लावली त्यानंतर तालुक्यातील त्यानंतर पावसाची तालुक्यात कुठेना कुठे मेहरनजर सुरू आहे. तालुक्यातील आठ प्रजन्यमान महसूल मंडळात या पाच दिवसाच्या दरम्यान झालेला सरासरी पाऊस ७२.३७ मिमी इतका आहे. सिल्लोड तालुक्यात अधिकृतपणे झालेल्या पावसाची (दि.२७) गुरुवार रोजी सकाळी ०८ वाजेपर्यंत झालेला पाऊस व कंसात एकूण सरासरी झालेला पाऊस मिमी मध्ये पुढील प्रमाणे आहे. 

सिल्लोड ४८ (८०) मीमी, भराडी २० (३९), अंभई ३३ (९९) मिमी, अजिंठा २७  (७५) मिमी, गोळेगाव ४३ (१५२) मिमी, आंमठाना ३५  (७२) मिमी, निल्लोड ११ (१८) मिमी, बोरगाव बाजार २४ (४१) मिमी तालुक्यातील आठही प्रजन्यमान मंडळात झालेला एका दिवसात व कंसात एकूण एकूण पाऊस २४१ (५७६) मिमी इतका असून एका दिवसात झालेला सरासरी पाऊस ३०.१२ मिमी असून आतापर्यंत झालेला पाऊस ७२.३७ मिमी इतका पाऊस झालेला आहे.