Sun, Jul 05, 2020 16:54होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : तांदूळवाडी येथे गळफास घेवून तरुणीची आत्महत्या 

औरंगाबाद : तांदूळवाडी येथे गळफास घेवून तरुणीची आत्महत्या 

Published On: Aug 22 2018 5:13PM | Last Updated: Aug 22 2018 5:13PMकन्नड  प्रतिनिधी  

आज बुधवार दि २२ रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या  सुमारास तालुक्यातील तांदूळवाडी येथील प्रियंका बजरंग मोरे या १७ वर्षीय तरुणीने गट नंबर ८१ मधील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही खबर पोलिस पाटील उत्तम केशव गोडसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिल्याने उपनिरीक्षक रोहित बेंबरे मनोज घोड़के यांनी घटना स्थळी धाव घेवून सदर तरुणीचे प्रेत शवविच्छेदनासाठी हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. 

ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मित मृत्‍यू म्‍हणून म्‍हणून करण्यात आली आहे. सदर तरुणीने दोन तरूणांच्या त्रासला कंटाळून आत्महत्या केल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा असून, अद्याप याबाबत पलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही.