होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : लांडग्यानी पाडला दोन बकऱ्यांचा फडशा

औरंगाबाद : लांडग्यानी पाडला दोन बकऱ्यांचा फडशा

Published On: Sep 13 2019 4:31PM | Last Updated: Sep 13 2019 3:54PM

file photoहतनूर : प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील मुकुंद सुपडु मोहिते यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या 2 बकऱ्यांचा लांडग्याने फडशा पाडला. गायीच्या वासराच्‍या कानाला चावा घेवून गंभीर जखमी केले. ही घटना (दि. 12) गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर हतनूर परीसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

मुकुंद मोहितेंच्या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा आहे. हिंस्त्र श्‍वापदांपासून रक्षण व्हावे यासाठी गोठ्याला लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यात आले आहे. या गोठ्यात गायीचे वासरु व बकऱ्या बांधून होत्या. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी गोठ्यात बकऱ्या बांधून घरी परतले. गुरुवारी सकाळी परत गोठ्यावर गेले असता त्यांना 2 बकऱ्या मृत पडलेल्‍या दिसल्या. त्याच शेतात लांडग्याच्या पाऊलखुणा आढळल्या. 

याशिवाय हतनूर परिसरात याआधी बिबट्याने गायीच्या एका वासरालासुद्धा जखमी केले आहे. तर गायीचा फडशा पाडला होता. या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार व वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. परिसरात लांडगे आल्याने दहशत पसरली आहे.