Sat, Jul 04, 2020 08:41होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विजेचा शॉक लागून जवानाचा मृत्यू 

औरंगाबाद : विजेचा शॉक लागून जवानाचा मृत्यू 

Last Updated: Jun 05 2020 5:44PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

आपल्या कर्तव्याच्या ठिकाणाहून गावी सुटीवर आलेल्या जवानाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. जितेंद्र लक्ष्मण सोनवणे (२९) असे या जवानाचे नाव आहे.

अधिक वाचा : प्रसुतीनंतर बाळाला पाहताही आलं नाही, कोरोनाने घेतला जीव

याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथील जवान जितेंद्र लक्ष्मण सोनवणे हे आर्मी मध्ये सेवा बजावत होते. आपले कर्तव्य बजावून ते चार दिवसांपूर्वी गावी निंभोरा येथे आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी शेतात स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. गुरुवारी सायंकाळी शेतातील घरावरील उघड्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. जितेंद्र सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. या जवानाचे करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. 

अधिक वाचा : औरंगाबादमध्ये ५९ रुग्णांची भर

शुक्रवारी निंभोरा येथे जितेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा : औरंगाबाद शहर १० ते १२ तास अंधारात