Thu, Nov 26, 2020 20:48होमपेज › Aurangabad › 'चारच नव्हे पुढची अनेक वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार'

चारच नव्हे पुढची अनेक वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Last Updated: Nov 22 2020 5:50PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना नसता तर, आपल्‍या सरकारने फार मोठी भरारी घेतली असती. पण असो आपल्‍याकडे भरपूर संधी आहे. पुढची चार वर्षेच नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार टिकाणार आणि चांगले काम करणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फंन्सिंगव्दारे औरंगाबाद मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) व्हिडिओ कॉन्फंन्सिंगच्या माध्यमातून औरंगाबाद मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी शहरातील दोन हॉटेल आणि एक नाट्यगृह अशा तीन ठिकाणी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी मोठे स्क्रिन लावण्यात आले होते.